ग्रामपंचायत वाळविहीर

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

logoooo
2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

जिल्हा परिषद शाळा

3

वाळविहीर येथे पाच जिल्हा परिषद शाळा आहेत यामध्ये वाळविहीर गावठाणात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे. तसेच वाड्या पाड्या वरती चार जिल्हा परिषद शाळा आहेत त्या इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात.

गावातील अंगणवाडी

2

वाळविहीर गावामध्ये एकूण सहा अंगणवाडी आहेत. गावात तीन नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे.तीनही अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे. तसेच त्या अंगणवाड्या नियमित भरवल्या जातात व लहान मुलांना पोषण आहार नियमित दिला जातो.तसेच वेळेवर त्याच्या लसीकरण तसेच गरोदर मातांना पोषण आहार व तपासणी घेतली जाते.

पाणी पुरवठा योजना

6

योजनाच्या पूर्वीची परिस्थिती:
वाळविहीर गावात सन १९८० पूर्वी झिरे, व खाजगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते. सन २०१३-२०१४ मध्ये नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प वाकीखापरी धरणामध्ये वाळविहीर पुनर्वसन झाल्यावर गावासाठी पाणीपुरवठा योजनेतून गावासाठी २०००० क्षमतेची जमिनीवरील पाणीटाकी बांधून देण्यात आली. संपूर्ण योजना पाईपलाईन देखभाल दुरुस्तीसह ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. परंतु सदर पाईप लाईनला गळती होऊन ती ग्रामपंचायत ने पंधरावित्त आराखडा मधून पाईप लाईन दुरुस्ती करण्यात आली. व गावांना वैयक्तिक नळ योजना या मधून देण्यात आली.व आज रोजी पाणीपुरवठा होत आहे.
पाणी पुरवठा योजनेला जोडलेल्या महसुली गाव/वाडी, वस्ती यांची संख्या व नाव: वाळविहीर ता.इगतपुरी जि.नाशिक. हे महसुली गाव असून त्यामध्ये १२ वाड्या वस्त्याचा समावेश आहे.या ठिकाणी वाड्या पाड्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.त्या मध्ये पाणीटाकी बांधकाम ,हातपंप बसवणे तसेच काही ठिकाणी नवीन विहिरी खोद काम करून त्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

वाळविहीर गावातील विकासकामे

वाळविहीर गावातील विकास कामे करण्यात आलेली आहे या मध्ये पंधरा वित्तआयोग, पेसा, आदिवासी योजनातील या योजना मधून गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था साठी पाणीटाकी बांधकाम ,हातपंप,पाईप लाईन दुरुस्तीचे कामे करण्यात आली आहे तसेच वाड्या पाड्यांना सिमेंट रस्ते,पायरवाडी येथे आदिवासी डोंगरी विकास व आमदार निधी मधून अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले आहे.तसेच राजवाडा येथे पाणीटाकी चे बांधकाम पंधरा वित्तआयोग निधीतून करण्यात आले.आहे तसेच लोहारवाडी,राजवाडा येथे कॉकरीटकरण सिमेंट रस्ते वित्त आयोगातून करण्यात आलेआहे.अंगणवाडी किचन शेड ,जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती,मॉडेल शाळा चे रंग पेंडिंगचे काम ,कचरा व्यवस्थापन शेड,मारुती वाडी येथे सार्वजनिक शौचालय बांधकाम,विहिरीचे गाळ कडून त्या विहिरीला आडवी बोर मारून त्याचे काम करण्यात आले आहे.शोषखड्डे ,गावाला पाणीपुरवठा पाईप लाईन,वास्त्यावरती हातपंप बसवण्यात आले आहे.